वन अविघ्न पार्क इमारत आगीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार : महापौर किशोरी पेडणेकर

0

मुंबई : करीरोड येथील महादेव पालव मार्गावर स्थित वन अविघ्न पार्क या बहुमजली इमारतीमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. दरम्यान, या आगीप्रकरणी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली असून तथ्य आढळल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल. तसेच तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here