रत्नागिरी : ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या भव्य बक्षीस योजनेतील दुसरी सोडत रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. या आठवड्यात रत्नागिरी शहरातील योजनेत सहभागी असणाऱ्या दुकानातून खरेदी केलेल्या ग्राहकांना उद्या बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. मागील आठवड्यात एका ग्राहकाला १ टू व्हीलर व दोन ग्राहकांना एलईडी टीव्ही बक्षीस म्हणून मिळाले होते. उद्याची साप्ताहिक सोडत फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड या बक्षिसांसाठी असणार आहे. शिवाय या सोडतीत बक्षिसे न लागलेल्यांना व्हॅगनआर कार व इतर लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीतजास्त ग्राहकांनी योजनेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांकडून जास्तीतजास्त खरेदी करावी असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:05 PM 23/Oct/2021
