भेलसई खांबेवाडी येथे तरुणासह कुटुंबीयांना मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

0

खेड : भेलसई खांबेवाडी येथे दि २० रोजी एका तरुणाला व त्याच्या कुटुंबीयांना दोन जणांनी काठीने जबर मारहाण केली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, खेड पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिस ठाण्यात दिनेश राजराम धाडवे (२८ रा.भेलसई, खांबेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार त्याच्या घरासमोर येऊन परशुराम बाबू निर्मळ (वय ७०) व विशाल परशुराम निर्मळ (२८) (दोन्ही रा.भेलसई, खांबेवाडी) यांनी त्यांच्यासह राजाराम सहदेव धाडवे व सौ. मनीषा राजाराम धाडवे यांना मारहाण केली. या मारहाणीत तिघे जण जखमी झाले. परशुराम निर्मळ यांची मुलगी अंकिता हिच्या सोबत प्रेम जुळल्याने तिच्या सोबत दिनेश याने लग्न केल्याचा राग मनात धरून ही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here