निलेश राणेंनी रामदास कदमांवर केलेल्या टीकेला पुत्र योगेश कदमांचे जोरदार प्रत्युत्तर

0

खेड : लाल दिव्याच्या गाडीसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या राणे कुटुंबीयांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही. गेल्या दहा वर्षात फक्त आणि फक्त मंत्रिपदाच्या लालसेपोटी पहिल्यांदा काँग्रेस तिथून स्वाभिमान पक्ष आणि त्यानंतर भाजप अशी वारी करणाऱ्या राणेंनी ना. रामदास कदम यांच्यावर आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे, असा पलटवार दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केला. शिवसेनेमधून ना. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादीत रामदास कदम यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते, असा आरोप माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला पलटवार करताना आ. कदम म्हणाले की, ना. नारायण राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर शिवसेना नेतेपदाची धुरा दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी शिवसेनेचा झंझावात निर्माण करण्यामध्ये रामदास कदम यांची मुख्य भूमिका होती. ना. कदम यांना विरोधीपक्ष नेतेपद दिले. ना. राणे हे ज्यावेळी पक्ष सोडून गेले. त्यावेळी रामदासभाईंची आणि ना. राणे यांची कधी भेटच झाली नाही. त्यामुळे महाडपर्यंत आले आणि परत गेले या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ना. राणे यांनी विरोधीपक्ष नेते पद सोडल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर भाईंची पक्ष नेतृत्वाने विरोधीपक्ष नेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसच्या यादीत कदम पहिले होते, असे नीलेश राणे यांचे वक्तव्य म्हणजे आपली पत पक्षामध्ये वाढविण्यासाठी केलेले हे नाटकच आहे. पण, अशा संधीसाधूंना कोकणातील जनता ओळखून आहे, असे आ. कदम म्हणाले. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या संदर्भातील त्या क्लिप्सबाबत बोलताना आ. कदम म्हणाले, आमची भांडणं आमच्या एका घरातील आहेत. ती आम्ही एकत्र घरात बसून सोडवू. यासंदर्भात नीलेश राणे यांना तसदी घेण्याची गरज नाही. ज्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदासह सर्वच गोष्टी भरभरून दिल्या त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्षनेतृत्वावर बिनबुडाचे आरोप करीत पक्ष सोडला. त्यांच्याकडून आम्हाला स्वाभिमानाचे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:10 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here