तुमच्याकडे आरोपी तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, कुठे गेला माहीत नाही, पण केस सुरू आहे; परमबीर सिंगांवरून उद्धव ठाकरेंचा टोला

0

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहीत नाही. केस सुरू आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंग यांना लगावला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जातं. त्याचा खर्च परवडत नाही. 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ… खणलं जातंय… चौकश्या सुरू आहे. धाडसत्रं सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे, असं सांगतानाच न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. हे टीमवर्क आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here