खेड : वरिष्ठ गट महिला व पुरुष १९ वी क्युरोगी व सातवी पुमसे तायक्वांदो स्पर्धेत खेड येथील खेळाडूंनी यश मिळवले आहे. रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अंतर्गत रत्नागिरी तालुका स्पोर्टस तायक्वांदो अॅकॅडमी यांच्या सहकार्याने एस. आर. के. क्लब रत्नागिरीतर्फे ही स्पर्धा झाली. रत्नागिरी येथे दि.१७ रोजी साळवी स्टॉप येथे झालेल्या या स्पर्धेत खेड तायक्वांदो स्पोर्टस् अॅकॅडमीच्या ७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांनी एक सुवर्ण, तीन रौप्य, एक कास्य पदकांची कमाई केली. पुरुष ६८ किलो वजनी गटामध्ये तेजस भैरवकर – सुवर्णपदक, ५४ किलो गटामध्ये राहुल लिंबोळे रौप्यपदक, ८७ किलो वरील गटात फरहान पठाण- रौप्यपदक, महिला ४६ किलो गटामध्ये हर्षदा पार्टे – रौप्यपदक, ५४ किलो गटामध्ये अविनाश निकम- कास्यपदक, सोहम हुमणे, रोशन चव्हाण- सहभाग, अशा पदकांची कमाई केली. खेड तायक्वांदो स्पोर्टस ॲकॅडमीचे अध्यक्ष मिलिंद इवलेकर, उपाध्यक्ष विनय तोडणकर, कुणाल चव्हाण, सचिव प्रशांत कांबळे, कोषाध्यक्ष अजय निगडेकर व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 23-Oct-21
