गुहागर : प्राध्यापिका मनाली बावधनकर यांनी ‘ओघळलेले मोती’ हे ललिल कथांचे पुस्तक लिहिले आहे. याचे प्रकाशन शनिवार, दि. २३ ऑक्टोबरला गुहागरमध्ये होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठी साहित्य परिषद गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी केले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा प्रकाशन सोहळा डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह, ज्ञानरश्मी वाचनालय गुहागर येथे होणार आहे. प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 23-Oct-21
