शनिवारी जळगावमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांनी भाजपला हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकार पाडण्यासाठी आम्ही हापापलेलो नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. हिंमत असेल तर चला जनतेच्या न्यायालयात, तुम्ही तीन पक्ष एकत्र आहात आणि आम्ही एकटे आहोत. बघुया कोण विजयी होते, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.
