सैन्यात महिलांनाही समान संधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

0

सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व महिलांकडे देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारलाही फटकारत महिलानाही लष्करात समान संधी द्या, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सुनावणी करताना म्हटले कि, समानता आणि लैंगिक न्याय हा महिला अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात फायदेशीर ठरणार आहे. महिलांच्या शारीरिक क्षमतेसंदर्भात केंद्रानं केलेला युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. केंद्रानं आपल्या दृष्टिकोन आणि मानसिकतेत बदल करायला हवा, लष्करात खरी समानता यायला हवी. तसेच मानसिक आणि शारीरिक क्षमतेचे कारण देत युद्धक्षेत्रातील महिलांची नियुक्ती नाकारणे अयोग्य असून, ही बाब अस्वीकाहार्य असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here