पूररेषेसंदर्भात निर्णय न झाल्यास जलआंदोलन

0

चिपळूण : शहरातील निळ्या व लाल पूररेषेसंदर्भात शासनाने कोणताही ठोस निर्णय अद्यापही घेतलेला नाही. यामुळे या रेषासंदर्भातील रद्दचा निर्णय येत्या ३० तारखेपर्यंत न घेतल्यास दिवाळीनंतर कधीही जलआंदोलनासह चिपळूण बंद करण्याचा इशारा चिपळूण बचाव समितीने दिला आहे. शुक्रवारी (दि.२२) चिपळण बचाव समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे शिरीष काटकर, बापू काणे, अरुण भोजने, सतीश कदम, उदय ओतारी, किशोर रेडीज उपस्थित होते. अतिवृष्टी व महापुरानंतर जलसंपदा विभागाने कोणालाही विश्वासात न घेता निळी व लाल पूर रेषा आखली आहे. या पूररेषेविरोधात आम्ही आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने हरकती मागविल्या. यामध्ये चिपळुणातील १२ हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत; परंतु या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय समिती येऊन गेली. या समितीने अथवा येथील अधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेणे आवश्यक होते; मात्र तसे झालेले नाही. यामुळे या समितीसह येथील अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:14 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here