राजापूर : स्वतःला घडवायचे असेल तर वाचनाकडे वळा. वाचन करणारी माणसेच जीवनात खूप यशस्वी होतात. आजच्या विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन वाचनाकडे वळावे आणि स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन प्रा. निंबाळकर यांनी केले. ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘ग्रंथालय विभाग’ आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत ग्रंथपाल प्रा. मनोहर कोंडागर्ले यांनी केले. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. ए. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. वाचनात खूप मोठी ताकद असून, वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनानेच कोणतेही परिवर्तन होऊ शकते म्हणूनच विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. पी. एस.मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. मनोहर कोंडागुर्ले यांनी तर आभार प्रा. डॉ.व्ही. एस. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.व्ही. एस.पाटील, डॉ. बी.टी. दाभाडे, डॉ.एस. एस. वाघमारे, प्रा. बी.ए.कश्यप, प्रा.एस. एस. धोंगडे, ग्रंथपाल प्रा. मनोहर कोंडागुर्ले सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी (ऑनलाईन)उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:07 PM 23-Oct-21
