“छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा ‘फोकस’ चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?”

0

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा “फोकस” का नाही वळला असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्य शासनाने या चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी केली आहे. राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यामध्ये जयंत पटेल, रमेश थोरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता. पत्रकारांना माहिती देताना शेलार यांनी राज्यात सुमारे 10 हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करुन आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना काळात गेल्या दिड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती असं म्हटलं आहे. कर्नाटक, चंदिगड सारख्या राज्यांनी आप-आपल्या राज्यातील कलावंताना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही याची आठवण करुन देण्यासाठी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले. तसेच या कलावंताना सरकारने मदत करावी अशी मागणी केल्याची माहिती दिली.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:10 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here