सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून खासदार संभाजीराजे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात संवाद साधत आहेत. ही यात्रा बुधवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात येत आहे. यानिमित्त मोहोळ व सोलापूर येथे मेळावा होणार असल्याची माहिती, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली. बुधवारी सकाळी ११ वा. मोहोळ येथील घटोळे मंगल कार्यालयात तसेच याच दिवशी सायंकाळी ५ वा सोलापुरातील शिवाजी प्रशालेत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात खासदार संभाजीराजे आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या जनसंवाद यात्रेत राजेंद्र कोंढरे (पुणे), संभाजी भोर (नगर), करण गायकर (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), धनंजय जाधव(पुणे), विनोद साबळे (पनवेल) आदींची प्रमुख सहभाग आहे. या पत्रकार परिषदेस राजन जाधव, भाऊसाहेब रोडगे, एकनाथ घाडगे, राम साठे, प्रा.सचिन गायकवाड, चंद्रकांत पवार उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 23-Oct-21
