महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्यापासून राज्यातील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसणार असून नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होत आहे. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे.
