ओंकार बागकर याचा गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार

0

गुहागर : राजा हिंदुस्थानी क्रीडा मंडळ कोतळूक उदमेवाडीचा सदस्य व खेळाडू ओंकार वैभव बागकर याने उत्तर प्रदेश गाझियाबाद येथे झालेल्या टी-टेन सिझन क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना एका सामन्यात सामनावीराचा बहुमान पटकावत चमकदार कामगिरी केली. त्याबद्दल त्याचा गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ओंकारने याआधी रत्नागिरी जिल्हा संघाकडून सिझन तसेच टेनिस क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याला अनुभवी खेळाडू राजू कनगुटकर यांनी सर्वप्रथम सिझनचे प्रशिक्षण दिले. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल ओंकारला खूप आनंद झाला असून, त्यासाठी त्याचे वडील, आई, कुटुंबातील वडीलधारी मंडळी, नातेवाईक, प्रशिक्षक रोहितकुमार मिश्रा (नागपूर), निनाद शिर्सेकर (राजापूर) यांचे सहकार्य लाभले. सत्कारावेळी गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर तावडे, सेक्रेटरी कैलास पिलणकर, गौरव वेल्हाळ, संजय पवार, बाबू गुहागरकर, सागर मोरे, नासीम साल्हे, आसीम साल्हे. सावंत सर, ओंकार बोरकर, वैभव बागकर, बाळू बागकर, सचिन ओक आदी उपस्थित होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:11 PM 23-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here