◼️ १५० +जणांची नावनोंदणी; २५ फेब्रुवारी ला अंबर हॉलमध्ये होणार स्पर्धा
रत्नागिरी : ‘ मैत्री ग्रुप रत्नागिरी यांच्या कोकम करी’ थीम रेस्टॉरंटच्या वतीने आयोजित रत्नागिरी पाककला महास्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातून १५०+ स्पर्धकांनी यात भाग घेतला असून दि. २५ रोजी ही स्पर्धा टीआरपी येथील अंबर हॉल येथे रंगणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत असून प्रत्यक्ष स्पर्धा बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
पारंपारिक तसेच लुप्त होत चाललेल्या अस्सल कोकणी पदार्थांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादित असून शाकाहारी, मस्त्याहारी आणि मांसाहारी अशा तीन प्रकारांत होणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये २१ हजार,असून एकूण बक्षिसांची रक्कम रुपये ५१ हजार इतकी आहे.
सुहाना मसाले यांच्या कडून 10 गिफ्ट हॅम्पर, आणि राघव एंट्रप्रयझस कडून सर्व सहभागी स्पर्धकांना स्पेशल गिफ्ट कुपन.
या स्पर्धेमुळे घरगुती चवीला व्यावसायिक व्यासपीठ मिळणार असून अनेकांसाठी छंदाला करिअरची दिशा मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी आयोजकांनी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ही स्पर्धा मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस, रत्नागिरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून कोकम करी रेस्टॉरंट, हर्षा टेरेस गार्डन रेस्टॉरंट, हॉटेल सी फॅन्स (मांडवी), अंबर हॉल आणि सुरुची केटरर्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsOx01bC-4LxnnjxL5IAGwmwonINJjp7O0E_KQuKo_6uDkpA/viewform?usp=dialog
आणि अधिक माहितीसाठी संपर्क : 8010803302 /9370550302/ 9822290859 यावर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 23-02-2026














