चिपळूण : लांबलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या पिकाच्या भात कापणीनंतर लोंबी गळण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्यापही पावसाचा अंदाज असल्याने शेतीच्या कामांचा उरक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
यावर्षी शेतीला मान्सूनने चांगली साथ दिली. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या पंधरवड्यापर्यंत अवकाळी मान्सूनने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे तयार झालेले भात पीक शेतात साचलेल्या पाण्यामुळे कापणे शक्य नव्हते. आता पावसाने परतीचा प्रवासाचे संकेत दिल्यानंतर कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, लोंब्यांच्या वजनामुळे भाताच्या काड्या लोंब्याही गळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
या वर्षीच्या मान्सूनने शेतकऱ्यांना दिलासा देणारी हजेरी लावली. मात्र, शेती तयार अडचणी निर्माण झाल्या. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने परतीचा मार्ग धरला. परिणामी, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत भात कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. मात्र, परिपक्व झालेले भात पीक व पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे शेतात भाताच्या लोंब्या भरघोस आल्या आहेत. परंतु, कापणीनंतर या लोंब्यांच्या वजनाने भाताची काडी मोडू लागली आहे, तर अवकाळी पावसामुळे कापणीस उशीर झाल्याने भाताच्या झाल्यानंतरही मान्सूनचा मुक्काम वाढल्याने अवकाळी पावसात तयार झालेले शेतातील भात पीक काही ठिकाणी आडवे झाले, तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे कापणीला अडचणी निर्माण झाल्या. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने परतीचा मार्ग धरला. परिणामी, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत भात कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. मात्र, परिपक्व झालेले भात पीक व पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे शेतात भाताच्या लोंब्या भरघोस आल्या आहेत. परंतु, कापणीनंतर या लोंब्याच्या वजनाने भाताची काडी मोडू लागली आहे, तर अवकाळी पावसामुळे कापणीस उशीर झाल्याने भाताच्या लोंब्याही गळण्याचे प्रकार घडू लागले.
निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हवालदिल
तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे कापून सुकत ठेवलेले भात पीक भिजले. त्याचाही परिणाम भाताच्या लोंबीवर झाला आहे. पावसाचा बेभरवशीपणा लक्षात घेता शेतकरी आता गळलेल्या लोंब्या जमा करून सुकलेले भात घरी नेण्यासाठी लगबग करू लागले आहेत. एकूणच निसर्गचक्राचा लहरीपणा, शेतकऱ्यांना हवालदिल करीत आहे. लोंब्या मोडण्याचे व गळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 30/Oct/2024













