बाळ मानेंच्या उमेदवारीने नाराजी उफाळली; तीन निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिक उदय बने यांना डावलून बीजेपीचे बाळ माने यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे. इतके वर्ष निष्ठावंत म्हणून भूमिका बजावणाऱ्यांना निष्ठेचे हेच फळ मिळाले काय ? असा प्रश्न आता शिवसैनिक विचारू लागले आहेत.

चार महिन्यांपूर्वी ज्या बाळ मानेनी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार विनायक राउत यांच्या विरोधात प्रचार केला त्यांना पक्षाने दिलेली हि उमेदवारी चांगलीच खटकली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे शिवसेनेतील अनेकजण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू लागले आहेत. मागील चार दिवसात साक्षी रावणांग, विजय गुळेकर आणि परशुराम कदम यांनी उदय बने यांच्यावर अन्याय झाल्याचे कारण देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यापुढे देखील मतदानाच्या तारखेपर्यंत प्रवेश सुरु राहतील, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

येत्या दोन दिवसांत आणखी एक मोठा प्रवेश होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. एकंदर उदय सामंत यांना शह देण्यासाठी बीजेपीचे बाळ माने यांना उमेदवारी देणे ठाकरे गटाला चांगलेच महागात पडत असल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 30-10-2024