मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ काल कण्हेरी येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा पार पडली.
या सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची आणि भावनिक होण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. अशातच शरद पवारांनी केलेल्या ‘नक्कले’वर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तो त्यांचा अधिकार आहे, पवार साहेबांना ज्या उंचीवर देश, महाराष्ट्र बघतो. एक राष्ट्रीय नेता, एक प्रगल्भ नेता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे असणाऱ्या, ज्याने रात्रीचा दिवस करू साहेबांना सतत सर्वत्र नेलं, सर्व मतदारसंघ सांभाळला. त्याठिकाणी एक सभा साहेब घ्यायचे आणि त्यावर निवडणूक व्हायची. साहेबांनी अशी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही,असं अजित पवार म्हणालेत.
पुढे अजित पवार म्हणाले, युगेंद्र पवारांनी नकल केली असती, आणखी कोणी केली असती, तर ते ठिक होतं. मी रूमाल काढला, त्यांनीही रूमाल काढला. त्या दिवशी माझ्या आई, वडिलांचं नाव घेतल्यानंतर मी भावनिक झालो. पण, मी थोडा थांबलो, पाणी पिलो आणि विषय बदलला, माणूस आहे, भावना असतात, भावनिक होतो, कायमच कठोर असतो, असं नाही. कधीकधी असं होतं, पंरतू ते नैसर्गिक पध्दतीने झालं. इतके दिवस वाटतं होतं, फक्त राज ठाकरे नक्कल करतात, पण आता दुसरं आणखी एक जण समोर आलं, मला वाईट वाटलं, दु:ख झालं की, साहेबांना दैवत मानलं. त्यांनी माझी नक्कल करावी, आम्ही लहानाचे मोठे त्यांच्यासमोर झालो. कधी कमी पडलो नाही, असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.
शरद पवारांनी केली अजित पवारांची नक्कल
शरद पवारांनी अजित पवारांच्या अजित पवारांच्या सभेवरून रुमाल काढून डोळे पुसून अजित पवारांची नक्कल केली. कन्हेरी येथे झालेल्या सभेत काल अजित पवार भाषण करताना भावनिक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे नाव न घेता, शरद पवारांनी रुमाल काढून डोळे पुसल्याची नक्कल केली. या नकलेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.
शरद पवारांच्या नकलेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी सांगितले. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 30-10-2024














