ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्याची संपत्ती ३७ कोटी ६८ लाख, ५८ हजार १५० रुपये असून, २०१९ च्या तुलनेत त्यात २६ कोटी, ११ लाख, ८५ हजार रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार २०१९ मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांची एकूण संपत्ती ११ कोटी रुपये होती. २०२२ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. सध्या त्यांची एकूण संपत्ती ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये एवढी आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये संपत्ती २६ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांची वाढ आहे. मुख्यमंत्र्यांवर ५ कोटी २९ लाख २३ हजार ४१० रुपये कर्ज असून, त्यांच्या पत्नीच्या नावे ९ कोटी ९९ लाख ६५ हजार ९८८ रुपयांचे कर्ज असल्याचे या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 30-10-2024














