संगमेश्वर : ताम्हाने हायस्कूलचे मुख्याध्यापक मारुती चोरमाले राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने या शाळेचे मुख्याध्यापक मारुती चोरमाले यांना नुकतेच बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या चोरमाले यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल धामापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश सप्रे, एम. डी. मोहिते, पी. एस. गमरे, रवींद्र पवार, सुरेंद्र पवार व दीपक चव्हाण उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 30/Oct/2024