रत्नागिरी : युवक हा खऱ्या अर्थाने राजकारणाचा पाया आहे. या पायावरच आपली संघटना मजबूत आहे. येथील युवा सेनेची ताकद सर्वांना सर्वश्रुत आहे. आता दुप्पट ताकदीने आपण परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा आणि रत्नागिरी विधानसभेवर भगवा फडकवू या, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी युवा सेना बैठकीत केले.
शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या अभ्युदय नगर येथील संपर्क कार्यालयामध्ये युवा सेनेची बैठक झाली. त्यावेळी बाळ माने बोलत होते. यापूर्वी माने यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस आदींसह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच महिला आघाडी आणि पाठोपाठ युवा सेनेचीही बैठक घेण्यात आली.
बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत, उपतालुका प्रमुख आशीष भालेकर, संदेश नारगुडे, शहर युवाधिकारी आशीष चव्हाण, विराज माने, सर्व विभाग प्रमुख, विभाग समन्वयक, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि उप शाखा प्रमुख यांच्यासह कॉलेज युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. युवकांच्या ताकदीवर ही निवडणूक यशस्वीपणे जिंकू शकतो, असा विश्वास यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 30-10-2024














