चिपळूण: चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथील इनाम जमिनी पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या स्थानिक शेतकरी (कुळ) कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी महसूल मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
नेमका प्रश्न काय?
- १९५७ मध्ये कुळ कायदा संपुष्टात येऊनही या जमिनींबाबत योग्य कार्यवाही झालेली नाही.
- १९७२ च्या फेरफारमध्ये या जमिनींवर ‘श्रीदेव भार्गवराम देवस्थानाचे’ नाव नोंदवण्यात आले, ज्यामुळे प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा उतारे नाहीत.
- या शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदल्याचा हक्क मिळणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार निकम यांच्या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर बैठक घेऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 25-02-2026














