चिपळूणमध्ये विकासकामांचा धडाका: उद्या भूमिपूजन सोहळा

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वतीने विविध योजनांतर्गत शहरात हाती घेतलेल्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

  • उद्घाटक: राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते आणि गृह (शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
  • कामांचे स्वरूप: खंड मापारी मोहल्ला, देसाई मोहल्ला येथे आर.सी.सी. गटार बांधकाम, पेठमाप रोड परिसरात गटार कामे आणि आंबेडकर स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण या कामांचा यात समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:31 25-02-2026