उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक वर्षे प्रलंबित दोन समस्या सोडवल्या
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून आलेले नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी निवडून आल्यापासून प्रभागात आपल्या कामांचा धडाका लावलेला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या सहकार्याने प्रभागातील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. नुकतेच त्यांनी पिण्याचा पाण्याचा आणि एका इमारतीजवळील सांडपाण्याचा प्रश्न सोडवला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जातं असून.
याबाबत प्रभागातील नागरिक सुचिता देसाई यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकी पोस्ट काय ?
सौरभ मलुष्टे हे नावच आज सर्वश्रुत आहे. एवढं धडाडीने कामं करतो की आपण थक्कच होतो. नगरसेवक होण्याआधीच एक समाजसेवक म्हणून कायम कार्यरत असायचा. आता तर सांगायची खोटी तुमचं काम झालंच पाहिजे.
गेली कित्येक वर्ष आमच्या पार्सेस स्कवेर परिसरात पाण्याचा प्रश्न होता.कधीच पाणी पुरवठा सुरळीत नसायचा.पण सौरभने त्याच्या मुळाशी जाऊन हा बिकट प्रश्न सोडवून टाकला. तसेच गेली कित्येक वर्ष आमच्या सुहास प्लाझा ह्या इमारती मध्ये शेजारील इमारतीचं सांडपाणी येत होतं. त्याच्यासाठी पण अनेक वर्ष पाठपुरावा केला.पण काही उपयोग होत नव्हता.सौरभला सांगितलं, त्यांनी हा प्रश्न मी सोडवणारच असे सांगितलं आणि खरंच त्यांनी ते करून दाखवलं.
त्याला कधीही फोन करा तो उचलणारच. बिझी असेल तर आपल्याला परत कॉन्टॅक्ट करेल.
असा आहे आमचा प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक सौरभ मालुष्टे. यश त्याच्या पाठीशी कायम असूदे, हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
पालकमंत्री उदय सामंत साहेब, नगराध्यक्ष शिल्पा ताई सुर्वे यांचा मार्गदर्शनामुळे व पाणी सभापती निमेश नायर, स्वछता सभापती बाबा नागवेकर यांचा सहकार्याने तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मदतीने हा प्रश्न सोडवता आला असे सौरभ मलुष्टे यांनी सांगितले…
अजून काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत आहे ती देखील समस्या लवकरात लवकर सोडवू असे देखील सौरभ मलुष्टे यांनी सांगितले…














