रत्नागिरी : भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे जिल्ह्यात आयोजन

रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षाचालक-मालक संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मूलन बैठका, शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, चर्चासत्र, निबंध स्पर्धा, पथनाट्य, योगावर्ग, व्यायामशाळा व ज्येष्ठ नागरिकांचे चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमांना अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 30-10-2024