रत्नागिरी : दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दापोली पोलीस व एसएसबी जवानांनी दापोली बाजारपेठेत पथसंचलन केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. दापोली पोलीस ठाण्यातून पथसंचलन सुरू करून दापोली बसस्थानक, अंबा पॉइंट, मच्छीमार्केट, लाला परब नाका, पोस्ट गल्ली, आसरा पूल, केळसकर नाका या मार्गाने संचलन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 30/Oct/2024














