चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्ष, असे १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी १२ जणांचे एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यात माघार कोण घेणार, याकडे मतदारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण मतदारसंघातून कल्याण येथील अमित रोहिदास पवार (अपक्ष), गोवळकोट चिपळूण येथील शेखर गंगाराम निकम (अपक्ष), राष्ट्रवादी काँग्रेसमधून सावर्डे येथील शेखर गोविंदराव निकम, सावर्डे येथील प्रशांत भगवान यादव (अपक्ष), नायरी संगमेश्वर येथील नसिरा अब्दुल रहमान काझी (अपक्ष), सुनील हरिश्चंद वेतोसकर (अपक्ष), खेर्डी येथील संतोष पांडुरंग शिंदे (समाज विकास क्रांती पार्टी), खेर्डी येथील प्रशांत बबन यादव आणि स्वप्ना प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून, तर सुनील खंडागळे (अपक्ष), अनघा कांगणे (अपक्ष), महेंद्र पवार (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 30/Oct/2024