रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एन. गी बी. ए.) समितीकडून मानांकन प्राप्त झाले आहे. अॅकॅडमीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व HT इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या तीन विभागांचे मूल्यांकन करण्यासाठी तपासणी केली होती. त्यानंतर हे मानांकन देण्यात आले. समितीने महाविद्यालयातील या तीनही विभागातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याना मिळणारा शिक्षणाचा दर्जा, शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक पद्धती, उत्तम रोजगाराच्या उपलब्ध संधी, महाविद्यालयातील प्राध्यापक व त्यांची त शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव, संशोधन, पेटंट इ. च्या आधारे महाविद्यालयाच्या तीनही विभागांना मानांकन प्रदान केले. र्या एआयसीटीई (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन) द्वारे नॅशनल ल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशनची (एनबीए) स्थापना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, की व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर
आणि संबंधित विषयांमधील शैक्षणिक संस्थांतील गुणात्मक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी केली गेली.
एनबीए या संस्थेची मुख्य उद्दिष्टे तांत्रिक शिक्षण कार्यक्रमांचे मूल्यांकन आणि मान्यता देणे, तांत्रिक शिक्षणाच्या संबंधित क्षेत्रातील मानकांचे समन्वय, निर्धार आणि नियमन यासाठी योग्य वैधानिक नियामक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने मूल्यांकन आणि प्रमाणीकरणासाठी मानके आणि मापदंड विकसित करणे असे आहे. एनबीए मानांकनाच्या यशस्वीतेसाठी होप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अरूणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व व्यवस्थापन प्रतिनिधी साईकृष्णा बेन्नरू यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
या प्रक्रियेसाठी प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, एनबीए समन्वयक व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. विनायक भराडी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. मिलिंद किरकिरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. शारदा चौगुले व सर्व विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 30/Oct/2024














