आजचे राशीभविष्य – २७ फेब्रुवारी २०२६

मेष

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील.

वृषभ

आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल.

समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे.

मिथुन

आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख – समाधान लाभेल.

कर्क

आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल.

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल.

कन्या

आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान – सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील.

तूळ

आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील.

वृश्चिक

आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे – पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल.

धनु

27 फेब्रुवारी, 2026 शुक्रवारी आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे.

मकर

आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज व्यापार – व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण – घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल.

कुंभ

आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल.

मीन

आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद – विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 27-02-2026