दापोली: लक्ष्मी ऑर्गनिक कंपनीच्या उत्पादनाविरोधात काँग्रेसचे आंदोलन

रत्नागिरी: लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑर्गनिक कंपनीत दीर्घकाळ न विघटन होणारी रसायने तयार करण्यास परवानगी दिल्याने दापोली तालुका काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • प्रमुख मागण्या: या उत्पादनावर तात्काळ बंदी घालावी, परिसरातील माती व पाण्याची स्वतंत्र तपासणी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर जनसुनावणी आयोजित करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
  • पर्यावरणाची भीती: पर्यावरणावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 27-02-2026