५ नोव्हेंबर ला उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा होण्याची शक्यता

रत्नागिरी : सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. विद्यमान आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा मतदारसंघ असून शिवसेनेचे दोन गट झाल्यावर होणारी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. सेनेमधील निष्ठवान इच्छुक उमेदवार उदय बने यांना डावलून मातोश्रीकडून थेट बीजेपी चे बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकीकडे निष्ठावान शिवसैनिक देखील नाराज असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या मतदारसंघात ५ नोव्हेंबर रोजी सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून स्थानिक नेतृत्वाला अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र येत्या ५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत उद्भव ठाकरे यांची सभा होणार असल्याची माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 30-10-2024