RTE प्रवेशातील १ किमी अंतराचा नियम रद्द करा; बाळा खेडेकर यांची मागणी

खेड: आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रियेत लागू करण्यात आलेला १ कि.मी. अंतराचा नियम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणत असल्याची भावना ठाकरे शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात, हा नियम रद्द करून पूर्वीप्रमाणे ३ कि.मी. अंतराचा नियम लागू करण्याची मागणी केली आहे. १ कि.मी.च्या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना जवळच्या दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळण्यात अडचणी येत असून चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 28-02-2026