खेड पंचायत समितीच्या इमारतीसाठी १०.५२ कोटींचा निधी मंजूर

खेड: खेड तालुक्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खेड पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्यासाठी शासनाने १० कोटी ५२ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

नागरिकांची पायपीट थांबणार

सध्या वाढत्या कामांमुळे पंचायत समितीचे विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्यामुळे नागरिकांना एका कामासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागते. नवीन इमारतीमुळे:

  • सर्व विभाग एकाच छताखाली: विस्तारानंतर सर्व प्रशासकीय विभाग एकाच इमारतीत येतील.
  • वेळेची बचत: नागरिकांना विविध कामांसाठी होणारी भटकंती थांबेल.
  • पारदर्शक कारभार: सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.

कामाचा दर्जा आणि कालावधी

हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मानकांनुसार हाती घेण्यात येणार आहे. निश्चित कालवधीत आणि उच्च दर्जाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसाठीही ही हक्काची नवीन सुविधा ठरणार असून स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 28-02-2026