मुंबई: उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होत असून, हा महिना सण-उत्सवांनी भरलेला आहे. होळी, धुलिवंदन, गुढीपाडवा आणि रमजान ईद यांसारख्या मोठ्या सणांमुळे मार्च महिन्यात बँकांचे कामकाज अनेक दिवस बंद राहणार आहे. जर तुमची बँकेत काही महत्त्वाची कामे असतील, तर सुट्ट्यांची ही यादी पाहूनच घराबाहेर पडा.
मार्च महिन्यात एकूण ११ दिवस सुट्टी
मार्च २०२६ मध्ये रविवार, दुसरा-चौथा शनिवार आणि सार्वजनिक सण मिळून बँकांना एकूण ११ दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध राज्यांतील स्थानिक सणांचाही समावेश आहे.
साप्ताहिक सुट्ट्यांची यादी:
बँकांना दर रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मार्च महिन्यात या सुट्ट्या खालील तारखांना येत आहेत:
- रविवारची सुट्टी: १, ८, १५, २२ आणि २९ मार्च.
- शनिवारची सुट्टी: १४ मार्च (दुसरा शनिवार) आणि २८ मार्च (चौथा शनिवार).
सण आणि उत्सवांनिमित्त बँकांना असणाऱ्या सुट्ट्या:
महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत खालील सणांनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहील:
- ३ मार्च (मंगळवार): धुलिवंदनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बँकांना सुट्टी असेल.
- १९ मार्च (गुरुवार): मराठी नववर्ष अर्थात ‘गुढीपाडव्या’निमित्त बँकांचे कामकाज बंद राहील.
- २१ मार्च (शनिवार): रमजान ईदनिमित्त बँका बंद राहतील.
- २६ मार्च (गुरुवार): रामनवमीनिमित्त बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
बँकांचे प्रत्यक्ष कामकाज बंद असले तरी, ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग आणि ATM सेवा चोवीस तास सुरू राहतील. मात्र, चेक क्लिअरन्स किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावयाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी या सुट्ट्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 28-02-2026














