रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक आणि सभापती-उपसभापती पदाची निवडणूक ९ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या विविध कलमान्वये या निवडणुकांचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजित गाताडे यांनी पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक आणि ठिकाण
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये ९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित सदस्यांची नावे प्रसिद्ध झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.
खालील तक्त्यामध्ये प्रत्येक तालुकानिहाय पिठासन अधिकारी आणि निवडीचे स्थळ देण्यात आले आहे:
| तालुका | पिठासन अधिकारी (Presiding Officer) | निवडीचे स्थळ |
| मंडणगड | सहा. जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी | राजमाता जिजाऊ सभागृह, पं. स. मंडणगड |
| दापोली | उपविभागीय अधिकारी, दापोली | छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. दापोली |
| खेड | उपविभागीय अधिकारी, खेड | छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. खेड |
| चिपळूण | उपविभागीय अधिकारी, चिपळूण | छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. चिपळूण |
| गुहागर | तहसीलदार, गुहागर | छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. गुहागर |
| रत्नागिरी | उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी | लोकनेते शामराव पेजे सभागृह, पं. स. रत्नागिरी |
| संगमेश्वर | जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रत्नागिरी | छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पं. स. देवरुख |
| लांजा | प्रादेशिक अधिकारी, MIDC रत्नागिरी | काळे छात्रालय सभागृह, पं. स. लांजा |
| राजापूर | उपविभागीय अधिकारी, राजापूर | किसान भवन सभागृह, पं. स. राजापूर |
कायद्यातील तरतुदींनुसार प्रक्रिया
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ५७(३), ५९(३), ६७ आणि ६८ मधील तरतुदींनुसार पार पडणार आहे. नियुक्त केलेले पिठासन अधिकारी विहित वेळेत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावून सभापती आणि उपसभापतींची निवड करतील.
राजकीय हालचालींना वेग
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सभापती आणि उपसभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, कोणत्या तालुक्यात कोणाची सत्ता येणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-03-2026









