पुष्कर श्रोत्रीला पितृशोक

Pushkar Shrotri: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री मराठी मनोरंजनसृष्टीतील सजग आणि कसलेला नट आहे. पुष्करवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले असून वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जातेय. एका प्रसिद्ध वृत्तसमुहात ते ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत होते. रविवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

पुष्कर श्रोत्रीला पितृशोक

अभिनेता पुष्कर श्रोत्री मनोरंजन श्रेत्रातील आघाडीचा नट आहे. सध्या पुष्कर श्रोत्रीला पितृशोक झालाय. पुष्करचे वडील सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले आहे. त्यांनी 65 वर्ष एका नामांकित वृत्तसमुहात काम केलं होतं. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत त्यांनी काम केलेलं. यासोबत साहित्यक्षेत्रातही त्यांचं काम नावाजलं गेलं. साहित्याची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या वडिलोपार्जित, लेडीज स्पशल आणि क्रिकेटर सचीन तेंडूलकरवर आधारित ‘खास सचिन’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले आहे. सुधाकर श्रोत्री यांनी पार्लेकर कायस्थ या त्रैमासिक मासिकात शेवटपर्यंत संपादक म्हणून काम केले. त्यांच्यावर आज विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

दरम्यान, पुष्कर श्रोत्री हा अनेक मराठी चित्रपटांसह नाटकांमध्ये काम केलं आहे. श्श… घाबरायचं नाही, लाभले आम्हास भाग्य, अ पेईंग घोस्ट ही पुष्करची नाटकं सध्या गाजतायत. आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोठा वाटा होता असं पुष्करने अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितले होते. पुष्कर सध्या हिंदीसह मराठी मनोरंजनविश्वात सक्रीय आहे. मराठी, हिंदी अशा 25 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांने काम केलंय. 2014 मध्ये त्याने रेगे चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली. त्यानंतर हसवा फसवी, सुर्याची पिल्ले, एक परिपूर्ण हत्या, आजीबाई जोरात या नाटकांमध्येही तो दिसला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:45 02-03-2026