रत्नागिरी : 75 किलो खिचडी वाटप; शिमगोत्सवात सुधीर साळवी यांची अनोखी सेवा

◼️ मागील दहा वर्षे सुरू आहे सेवा, हजारो भाविकांची हजेरी

रत्नागिरी : रत्नागिरीत शिमगोत्सवाला भरते आले आहे. सोमवारी मिऱ्या येथील नवलाई पावणाई जाकीमिऱ्या पालखीसह टेंब्ये आणि सडामिऱ्या येथील पालख्या शहरात दाखल झाल्या. या पालख्यांसोबत हजारो भाविक पायी रत्नागिरीत दाखल झाले. या भाविकांच्या सोयीसाठी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक सुधीर साळवी यांच्याकडून खिचडीचे वाटप करण्यात आले. मागील 10 वर्ष सुधीर साळवी यांच्याकडून ही सेवा सुरू आहे.

शिमगोत्सवात अनेक पालख्या भैरीच्या भेटीसाठी दाखल होत असतात. होळी पौर्णिमेला मिऱ्या येथील पालखी भैरीच्या भेटीसाठी दाखल होते. तसेच आणखी दोन पालख्या होळी पौर्णिमेला शहरात दाखल होतात. यावेळी हजारो भाविकही पालखीसोबत शहरात येतात. दिवसभर पालखीसोबत चालून थकलेल्या भाविकांची सेवा मागील 10 वर्षांपासून सुधीर साळवी यांच्याकडून सुरू आहे.

पालखी जाण्याचा मार्ग असलेल्या गोखले नाका धमालनीचा पार येथे मागील 10 वर्षांपासून खिचडी वाटपाची सेवा साळवी यांच्याकडून अविरत सुरू आहे. यावर्षी देखील ही सेवा करण्यात आली. यावेळी तब्बल 75 किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही सेवा सुरू होती. यावेळी सुधीर साळवी यांच्यासोबत निहार साळवी, रुपेश सावंत, आर्य सावंत, कल्पेश सावंत देखील उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 04-03-2026