मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आता इराणमध्ये त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार या चर्चा सुरू होत्या.
दरम्यान, याबाबत एक्सपर्ट असेंबलीने मोजतबा खामेनेई यांची देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. इराण इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, ही निवड शक्तिशाली इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या दबावाखाली करण्यात आली.
इराण इंटरनॅशनलच्या एका विशेष अहवालानुसार, ही निवड शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली करण्यात आली. सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे एक्सपर्ट असेंबलीची पूर्ण बैठक होऊ शकली नाही, म्हणून हा निर्णय व्हर्च्युअल बैठका आणि अंतर्गत सल्लामसलत करून घेण्यात आला.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने मोजतबा यांना पाठिंबा देण्यासाठी कट्टरपंथी गटांना एकत्र आणल्याचे वृत्त आहे. हा गट खामेनेई यांच्या जवळचा गट होता. सुरक्षा यंत्रणेत त्यांची मजबूत पकड आहे.
मोजतबा खामेनेई हे मध्यम-स्तरीय शिया धर्मगुरू आहेत. त्यांनी पडद्यामागे दीर्घकाळ प्रभावशाली भूमिका बजावली आहे. ही नियुक्ती वादग्रस्त आहे. कारण इराणच्या इस्लामिक क्रांतीचा गट वंशपरंपरागत उत्तराधिकार नाकारतो आणि अनेक कट्टरपंथी लोक त्यावर आक्षेप घेऊ शकतात, या निवडीला ते ‘राजशाही’ असे म्हणू शकतात.मोजतबा यांची धार्मिक पात्रता देखील सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी अपुरी मानली जाते, पण आयआरजीसीच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झाले.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायली हल्ल्यात अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्यानंतर तीन सदस्यांच्या अंतरिम परिषदेने तात्पुरते सत्ता हाती घेतली. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले होते की, लवकरच नवीन नेता निवडला जाऊ शकतो. मोजतबा यांची नियुक्ती आता इराणमधील कट्टरपंथी शक्तींना आणखी बळकटी देणारी म्हणून पाहिली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 04-03-2026














