रत्नागिरी : शहरानजीकच्या एकदंतनगर फाट्याजवळ उभ्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
नेमकी घटना काय? सोमवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास एकदंतनगर फाट्याजवळ एक इर्टिगा कार (MH-08-AN-8904) उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. कारच्या काचांना बाष्प (वाफ) पकडले होते, ज्यामुळे संशय बळावला. गाडीची काच फोडून दरवाजा उघडला असता, आत वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (वय ४३, रा. नवेदरवाडी-खेडशी, रत्नागिरी) हे झोपलेल्या अवस्थेत आढळले.
रुग्णालयात मृत घोषित: त्यांना कोणतीही हालचाल करत नसल्याचे पाहून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासणीपूर्वीच ‘मृत’ घोषित केले. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 04-03-2026














