चिपळूण:
रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, चिपळूण रेल्वे स्टेशन फाट्या जवळून तब्बल १० किलो १३८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ४ लाख ६८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ३ मार्च रोजी रात्री ८.२० च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील सबवे खाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी आकाश विजय जाधव (वय ३३), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८) आणि शंकर विनोद पारदे (वय ३१) हे या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने तिथे थांबले होते.
पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाईल, एक रिक्षा आणि एक ॲक्टिव्हा दुचाकी जप्त केली आहे. एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत आरोपींवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-03-2026













