मुंबई (प्रतिनिधी): बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने २७५ ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ (Specialist Officers) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. प्रामुख्याने आयटी (IT), डेटा सायन्स आणि रिस्क मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ही मोठी संधी आहे.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना २३ मार्च २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
रिक्त पदांचा तपशील (एकूण २७५ पदे):
बँकेने विविध २१ प्रवगांमधील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या जागा जाहीर केल्या आहेत. त्यापैकी प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:
- आयटी क्षेत्र: आयटी ऑफिसर (८२ पदे), इन्फॉर्मेशन/सायबर सिक्युरिटी (३८ पदे), प्रॉडक्शन सपोर्ट (२६ पदे), डिजिटल चॅनेल मॅनेजर (२३ पदे).
- डेव्हलपमेंट: सॉफ्टवेअर डेव्हलपर – Java (१३ पदे), .NET (०६ पदे), मोबाईल डेव्हलपर (०३ पदे).
- डेटा आणि एआय: डेटा इंजिनिअर (१५ पदे), डेटा सायंटिस्ट (०६ पदे), जनरेटिव्ह एआय (०२ पदे).
- मॅनेजमेंट आणि इतर: रिस्क मॅनेजर (०४ पदे), टॅक्सेशन/CA (०२ पदे).
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:
- आयटी पदे (Post No. 1 to 19): कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्समधील B.E./B.Tech. किंवा MCA पदवी आवश्यक. सोबत पदाच्या दर्जानुसार २ ते १० वर्षांचा अनुभव अनिवार्य.
- रिस्क मॅनेजर (Post No. 20): MBA/MMS (Finance/Banking) किंवा स्टॅटिस्टिक्समधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव.
- टॅक्सेशन (Post No. 21): चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवी आणि २ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा (३१ जानेवारी २०२६ रोजी):
- स्केल I ते III: कमाल ३० ते ३५ वर्षे.
- स्केल IV: कमाल ४५ वर्षे.
- सवलत: अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत मिळेल.
अर्ज शुल्क:
- सामान्य/OBC/EWS प्रवर्ग: ८५० रुपये.
- SC/ST/PWD/महिला उमेदवार: १७५ रुपये.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ मार्च २०२६.
- लेखी परीक्षेचा अंदाजित महिना: एप्रिल २०२६.
- मुलाखतीचा अंदाजित महिना: एप्रिल २०२६.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Recruitment’ विभागात ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि फी भरून अर्ज सादर करावा.
बँकिंग क्षेत्रात तज्ज्ञ अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














