मंडणगड : कर्मवीर इदाते महाविद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश

मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये यश संपादन केले. यामध्ये इयत्ता १२ वी वाणिज्य वर्गातील यश अंकुश शेडगे याने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मुलांच्या गटातून लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक तर उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक संपादन केला. तर इयत्ता ११ वी वाणिज्य वर्गातील सुमित सचिन दिवेकर याने ८०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक व २०० मीटर धावणे तृतीय क्रमांक संपादन केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडणगड परिसरातून अभिनंदन होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुयश प्राप्त केले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक प्रा. अशोक कंठाळे, प्रा. साई पवार, प्रा. रोहित सुखदरे यांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा संपदा पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक कंठाळे, प्रा. साई पवार, प्रा. रोहित सुखदरे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 30/Oct/2024