आजचे राशीभविष्य, ०९ मार्च २०२६

मेष – आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

वृषभ – व्यापार – व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.

मिथुन – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता.

कर्क – आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल.

सिंह – आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या – आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही.

तूळ – आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक – आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु – आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल.

मकर – आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल.

कुंभ – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल.

मीन – आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 09-03-2026