खेड : लवेलनजीक वॅगनार कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजीक अथर्व पेट्रोलपंपासमोरील दुभाजकाजवळ वॅगनार कारला धडक देत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप्पा सहीबेन महनंत (41) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोहित रघुनाथ कदम (32) यांनी तक्रार दाखल केली आहे. ते वॅगनार कारने (एम.एच.-17/सी.आर.-0669) चिपळूणाच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून (एमएच-03/एक्यू-1203) महनंत याने कारला समोरून धडक दिली. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपारादरम्यान यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 30/Oct/2024