इस्त्रायल आणि हमास तसेच हिजबुल्लाह यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु होते. या युद्धात इराणने उडी घेतली. 1 ऑक्टोंबर रोजी इराणने इस्त्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागले. त्याचवेळी इस्त्रायलने बदला घेणार असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी इराणवर इस्त्रायलवर हल्ला केला. त्या हल्ल्यात इराणचे अनेक संरक्षण तळे, इंधन पुरवठा केंद्र उद्ध्वस्त झाले. आता पुन्हा शत्रूने इस्त्रायलवर हल्ला करण्याचे साहस करु नये, यासाठी इस्त्रायलने ‘ब्रह्मास्त्र’ काढले आहे. इस्त्रायल आपली हवाई संरक्षण क्षमता बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने राफेल प्रगत संरक्षण प्रणाली आणि एल्बिट सिस्टमसह $534 दशलक्ष किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत इस्रायलला आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन सिस्टीम घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. इस्त्रायलसाठी हे ब्रह्मास्त्र ठरणार आहे.
काय आहे लेझर इंटरसेप्शन सिस्टीम
इस्त्रायलने आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन सिस्टीम आपल्या ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जे शत्रूचे ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करण्यास सक्षम आहे. राफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टम्स आणि एल्बिट सिस्टम्स या इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपन्या आहेत. त्याच्या वेबसाइटवर, राफेलने आयर्न बीमचे वर्णन “100kW क्लास हाय एनर्जी लेसर वेपन सिस्टीम” म्हणून केले आहे. या पद्धतीची ही पहिली प्रणाली असणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हे प्रणाली शेकडो मीटर ते कित्येक किलोमीटर लांबपर्यंत असणारे लक्ष्यावर प्रभावी मारा करु शकते.
संरक्षण मंत्रालयाशी करार
आयर्न डोम सिस्टमची किंमत प्रति वापरासाठी सुमारे दोन डॉलर आहे. त्याची किंमत इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी 2022 मध्ये राफेल कारखान्याच्या भेटीदरम्यान उघड केली होती. एल्बिट सिस्टम्सने सोमवार सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने त्यांच्याशी करार केला आहे. हा करार आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन सिस्टीमसाठी आहे. आता कंपनी उच्च दर्जाचे विविध धोक्यांचे सामना करणारी प्रणाली देणार आहे.
एल्बिट सिस्टम्सचे अध्यक्ष आणि सीईओ बेजहेल मचलिस यांनी म्हटले की, इस्त्रायल लेझर सेंटर आणि उच्च शक्ती लेझर प्रौद्योगिकीमध्ये जागतिक पातळीवर अव्वल आहे. त्याच्या यशाबद्दल आम्हाला अभिमान आहे. एल्बिट सिस्टम्स देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे योगदान देणार आहे. दरम्यान, इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षावर अमेरिकेने आपली भूमिका जाहीर केली आहे. इराणने इस्त्रायलवर पुन्हा हल्ला केल्यास अमेरिका इस्त्रायलची मदत करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.