मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील.
वृषभ – प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल.
मिथुन – आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील.
कर्क – आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल.
सिंह – आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील.
कन्या – आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील.
तूळ – आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल.
वृश्चिक – शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल.
धनु – आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर – आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल.
कुंभ – आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.
मीन – आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 11-03-2026













