रत्नागिरीतील (RAPID MOVE EXPORT IMPORT)रॅपिड मुव्ह एक्सपोर्ट इम्पोर्ट ची इराण भरारी…

रत्नागिरीतील कल्पक युवा उद्योजक, श्री. राजवर्धन विक्रांत रावराणे. यांच्या रॅपिड मूव्ह एक्सपोर्ट इम्पोर्ट ह्या आयात निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने नुकतीच 20 मेट्रिक टन केळी इराणला निर्यात करण्यात यश मिळवलं.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? हे लक्षात घेऊन रॅपिड मूव्ह एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनी शेतमाल आणि इतर गोष्टींची आयात आणि निर्यात करत असते.

ह्यावेळेस इराणला एक्सपोर्ट केलेली केळी ही वातानुकूलित कंटेनर मधून इराणला पाठवण्यात आली . भारतातून पाठवल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी माल इराणला पोहोचतो.
सदर केळी सोलापूर मधून खरेदी करण्यात आली . उच्च गुणवत्ता निकषांवर तपासूनच शेतमाल आयात किंवा निर्यात करण्यात येतो. ही consignmnet पाठवण्यासाठी श्री राजवर्धन विक्रांत रावराणे यांना
श्री.वर्धन दिलीप बाईंग यांचे विशेष सहकार्य लाभलं .श्री. वर्धन बाईंग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रुअर(brewer) आहेत …या विषयाचे प्रगत शिक्षण त्यांनी UK मध्ये जावून प्राप्त केले आहे. त्यांना शेती करण्याची आवड असून त्यांनी पुणे येथे झुकिनी या विदेशी भाजीची शेती सुरू केली आहे.नजीकच्या काळात इतर विदेशी भाज्यांची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे .
भारत मधून जास्तीत जास्त एक्सपोर्ट करून अधिकाधिक परदेशी चलन भारतात घेवून येणे हे श्री .रावराणे आणि श्री. बाईंग यांचे ध्येय आहे.

रॅपिड मुव्ह एक्सपोर्ट इम्पोर्ट ही कंपनी ,गेले साडेतीन वर्षापासून कार्यरत आहे.श्री. राजवर्धन रावराणे हयांनी ,एका मोठ्या अपघातातून सावरून, मोठ्या हिमतीने हा व्यवसाय उभारला आहे .मागील तीन वर्षात कंपनीने कांदा तसेच 3 कंटेनर सुरण UAE ला एक्स्पोर्ट केले आहे.या सुरणाची खरेदी विजयवाडा येथून करण्यात आली होती. तसेच आंबा युएसए( USA ),कुवैतला(Kuwait) पाठवला आहे.
चिंच इंडोनेशिया मधून घेऊन मलेशियाला पाठवली आहे.
हा सर्व व्यवसाय उभा करताना SCGT अर्थांत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट,या मराठी उद्दोजकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. अस श्री राजवर्धन यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

एक्सपोर्ट इम्पोर्ट ह्या व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, त्यांचे नियम,चांगले कनेक्ट यांचा सखोल अभ्यास गरजेचा असतो.त्याचबरोबर सतत नवींन संधी शोधण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची चिकाटी हवी असते.

श्री. राजवर्धन यांनी मोठ्या धाडसाने हे गुण आत्मसात करून ते ह्या व्यवसायात यश प्राप्त करत आहेत.भविष्यात कोकणातील शेतमाल जास्तीत जास्त एक्सपोर्ट कसा करता येईल यादृष्टीने त्यांचा अभ्यास व प्रयत्न सुरू आहेत.ज्यांना आपला माल एक्सपोर्ट करायचा आहे किंवा काही इम्पोर्ट करायचे असल्यास त्यांनी रॅपिड मुव्ह एक्सपोर्ट इम्पोर्ट जरूर संपर्क साधावा असे आव्हान श्री. राजवर्धन विक्रांत रावराणे( 93714 77378)यांनी केलं आहे.अधिक माहितीसाठी https://www.rapidmoveexportimport.com या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.