खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडमधील भोस्ते घाटामध्ये बुधवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास एका कारला अचानक लागलेल्या आगीमुळे ‘बर्निंग कार’चा थरार पाहायला मिळाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला भोस्ते घाट चढताना अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कारमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेतला. ही कार तब्बल दोन तास पेटत होती. महामार्गावरील एक मार्गिका तात्पुरती बंद करून दुसऱ्या मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. या बाबतची माहिती येथील नगर परिषदच्या अग्निशमन बंबला मिळताच अग्निशमन जवानांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 31/Oct/2024












