दापोली : शाळेला सुटी तरीही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी फराळ आणि रांगोळीतून मतदान जागृतीचा मार्ग अवलंबून मतदारांना जागृत करण्याचा नवा फंडा विद्यार्थ्यांनी अवलंबली आहे. आता जिलेबीचा प्रोडक्शनमधूनदेखील अशाच प्रकारची जनजागृती करणार असल्याचे स्विपचे विधानसभा नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
मतदार जागृतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरचोले व स्विफ्ट नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांकडून दिवाळीचा फराळ व रांगोळीमधून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुले आपल्या आई-वडिलांना पत्ररूपी भेटकार्ड देऊन पालकांचे प्रबोधन करत असून, आईसोबत तयार करत असलेल्या करंजीवर, तसेच अंगणातील रांगोळीतून मतदान जागृती संदेश देऊन महत्व सांगत असल्याचे स्विपचे विधानसभा नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
ए जी. हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी हा प्रयोग केला आहे. विद्यार्थ्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. दिवाळीची सुट्टी पडली असली तरी मतदान जनजागृती ही वेगवेगळ्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींनी चक्क फराळावरच मतदान करण्याबाबतचे संदेश लिहून घरोघरी वाटप करायचे ठरवले. फराळाप्रमाणे जिलेबीमधूनदेखील अशा पद्धतीच्या सूचना तयार करून जनजागृती केली जाणार असल्याचे स्विपचे विधानसभा नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 31/Oct/2024














